रेशन कार्डवर नाव नोंदवण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? उत्तर: आधार कार्ड, रहिवासी पुरावा (वीज बील, रेशन कार्ड), पासपोर्ट साईज फोटो.
माझं नाव रेशन यादीत दिसत नाही, काय करावे? उत्तर: तुमचं KYC पूर्ण झालं आहे का ते तपासा. यादी अद्यतनित नसल्यास अन्न सुरक्षा पुरवठा विभाग केंद्रात किंवा तहसील कार्यालयात चौकशी करा.
रेशन मिळत नाही, तरी नाव यादीत आहे. कारण काय? उत्तर: कधी कधी आधार eKYC पूर्ण नसल्याने लाभ थांबतो. अन्न सुरक्षा पुरवठा विभाग किंवा दुकानदाराकडे मशीनमध्ये तुमचं नाव तपासा किंवा KYC अपडेट करा.
मोबाईल नंबर बदलायचा असल्यास काय करावे? उत्तर: Aadhaar सेवा केंद्रावर जाऊन मोबाईल नंबर अपडेट करा. त्याशिवाय OTP येणार नाही आणि eKYC होणार नाही.
नवीन रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो का? उत्तर: हे शक्य आहे. https://rcms.mahafood.gov.in अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाइटवर तपासा.
रेशन डीलर चुकीचा माहिती देतो किंवा धान्य देत नाही तर काय? उत्तर: त्या संदर्भात तक्रार स्थानिक आपूर्ति निरीक्षक किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात करता येते. ऑनलाईन तक्रार पोर्टलही आहे.
रेशन कार्डवर सदस्य वाढवायचा/काढायचा असल्यास? उत्तर: नवीन सदस्याचा आधार व नाते सांगणारे प्रमाणपत्र आवश्यक. अन्न व नागरी पुरवठा विभाग कार्यालयात अर्ज द्या.
eKYC किती वेळात अपडेट होते? उत्तर: सामान्यतः 24-48 तासात याची नोंद ऑनलाईन होते. कधी कधी यादी अपडेट होण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो.