ई-केवायसी करण्यासाठी आवश्यक ॲप्स

ई-केवायसी कसे करावे:

  1. Mera eKYC ॲप उघडा आणि माहिती भरा:
    • ॲप उघडल्यानंतर राज्य निवडा
    • आपला आधार क्रमांक टाका आणि मोबाईलवर आलेला OTP टाका.
    • आपली सर्व माहिती पडताळून ती सबमिट करा.
  2. AadhaarFace स्कॅन प्रक्रिया पूर्ण करा:
    • 'फेस ई-केवायसी' पर्याय निवडा आणि सेल्फी कॅमेरा सुरू करा.
    • कॅमेऱ्यासमोर डोळे उघड-बंद करा, यामुळे चेहरा स्कॅन होईल.
    • प्रक्रिया पूर्ण झाल्यावर यशस्वी ई-केवायसीचा मेसेज मिळेल.